“जेवणाचं ताट वाट पाहत होतं पण…”, बंडखोर आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक

मुंबई | विधानसभा अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. यानंतर सभागृहात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. दरम्यान, हे मतदान झाल्यानंतर काही शिवसेना आमदारांसह आदित्य ठाकरे सभागृहातून उठून निघून गेले.
आदित्य ठाकरे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे समोर उभे ठाकले. सुर्वे समोर येताच ‘त्या दिवशी जेवणाचं ताट वाट पाहत होतं, तुम्ही हे काय केलं?’ असा सवाल उपस्थित केला. मात्र, सुर्वे हे निशब्द झाले.
बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आदित्य ठाकरेंसमोर येताच, दोघांमधील संवाद काय? काय सांगणार मतदार संघाला? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. एवढे जवळचे असुन सुद्धा …असं कराल याची खरचं अपेक्षा नव्हती. अशी खंत आदित्य यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच त्या दिवशी जेवण ठेवलं होतं. जेवणाचं ताट वाट पाहत होतं, तुम्ही हे काय केलं असा सवाल उपस्थित करत माझ तुमच्यावर खरोखर प्रेम होतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. ठिक आहे बघा आता विचार करा. पण मला स्वतःला दुःख झालं. हे तुम्हाला पण माहितीये. अशा शब्दात मनतील भावना आदित्य यांनी यावेळी व्यक्त केल्या. मात्र, सुर्वेंनी आदित्या ठाकरे यांच्या बोलण्यावर मौन बाळगले.