शिंदे-ठाकरे उद्या आमने-सामने; एकच दिवशी, एकाच वेळी अन्…
पुणे : (Aditya Thackeray On Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार दि. 02 रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते सासवडला जाहिर सभा देखील घेणार आहेत. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे गटात गेलेल्या माजी आमदार विजय शिवतारे यांच्या सासवड मतदारसंघात ही सभा होणार आहे. त्या सभेत एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची राज्यात सध्या बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सासवडची सभा आटोपल्यावर ते ७ वाजता पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये बंडखोर आमदार तानाजी सावंतांची भेट घेणार आहेत. बरोबर त्याचवेळेला आदित्य ठाकरे हे कात्रजमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.
ज्या ठिकाणी ठाकरे यांची निष्ठा यात्रा झाली तिथे घेतलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेशी बंड केलेल्या आमदारांना गद्दार, बंडखोर म्हणून डिवचण्या प्रयत्न केला आहे. उद्या तर शिंदे-ठाकरे एकाच दिवशी, एकाच शहरात आणि एकाच वेळेत वेळेत पहायला मिळणार आहेत. त्यामुळे ठाकरे-शिंदे आमना सामना होण्याची पुर्ण शकत्या आहे. आदित्य ठाकरे शिंदे यांच्या विषयी काय बोलतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंना काय उत्तर देतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.