ताज्या बातम्यारणधुमाळी

“ज्यांना पाचवेळा आमदार, मंत्री बनवलं त्यांनीच गद्दारी केली”

औरंगाबाद | Aditya Thackeray On Rebel MLA’s – सध्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मेळावे घेण्याचं काम आदित्य ठाकरेंकडून सुरू आहे. आज (शनिवार) औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर, पैठण आणि सिल्लोड येथे सभा घेत शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या लोकांना आम्ही पाच वेळा आमदार बनवलं, त्यांच्या सांगण्यावरून मंत्रीही बनवलं त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. आमच्या पैठणच्या विकासासाठी 14 कोटींचा निधी दिला होता असं बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये बोलताना ते म्हणाले. त्याचबरोबर ज्यांना मी लहानपणापासून बघितलं त्यांनी गद्दारी केली. बंडखोरांनी पाठीत खुपसलेल्या खंजीरीचं दु:ख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

“औरंगाबादमध्ये पाच आमदारांनी बंडखोरी केली. आता त्यांच्या जागेवर नवीन पाच आमदार निवडून येणार आहेत. हे सरकार कोसळणार आहे. या गद्दारांना भाजपने वाॅशिंगमध्ये टाकून स्वच्छ केलं का?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. लाज असेल तर गद्दारांनी राजीनामे द्यावेत आणि परत निवडून दाखवावे असा इशारा देखील आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये