देश - विदेशरणधुमाळी
ज्ञानवापी नंतर आता दिल्लीची जामा मशीद हिंदू संघटनांच्या निशाण्यावर
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाराणसीची ज्ञानवापी मशीद वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. त्यांनतर आता दिल्लीची जामा मशीदही हिंदू संघटनांच्या निशाण्यावर आली आहे. या मशीदीखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून जामा मशिदीचा चबुतरा आणि पायऱ्या खोदून काढण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
स्वामी चक्रपाणी यांनी शाही इमामांकडे जामा मशिदीचे उत्खनन करण्याची परवानगी मागितली आहे. यात जे काही सत्य असेल ते लोकांसमोर येईल, असे ते म्हणाले. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात असताना हिंदू महासभेने ही मागणी केली आहे.