ताज्या बातम्यामनोरंजन

केकेच्या निधनानंतर इमरान हाश्मी ट्विटरवर होतोय ट्रेंड, जाणून घ्या कारण

मुंबई | After The KK Death Emraan Hashmi Trend On Twitter | प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ (KK) म्हणजेच ‘केके’ चं मंगळवारी रात्री निधन झालं आहे. कोलकत्यामध्ये लाइव्ह कॅान्सर्टदरम्यान (Live Consert) अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचं १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं आहे. तो ५३ वर्षांचा होता. त्याचबरोबर केकेच्या निधनानं बॅालिवूडसह संपूर्ण संगीत क्षेत्राला धक्का बसला आहे.

केकेच्या निधनानंतर मात्र अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) ट्विटरवर ट्रेंड (Trend On Twitter) होत आहे. याचं कारण देखील खास आहे. केकेच्या आवाजामध्ये एक वेगळीच जादू होती. त्यामुळे त्याचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे रोमँटिक गाणी गाण्यामध्ये त्याचा हातखंडच होता. तसंच इमरानसाठी केकेने खूप गाणी गायली आहेत.

सध्या केकेच्या निधनानंतर इमरानचा आवाज देखील हरपला आहे असं बोललं जात आहे. केके आणि इमरान या गायक-अभिनेत्याची जोडी सुपरहिट होती. चाहते केकेने गायलेली इमरानची गाणी ट्विटरद्वारे शेअर करत गायकाला श्रद्धांजली वाहत आहेत. तसंच केकेने इमरानसाठी बरीच रोमँटिक गाणी गायली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला आहे. दिल इबादत (Dil Ibadat), जरा सा (Jara Sa), तू ही मेरी शब है (Tuhi Meri Shab Hain), बिते लम्हे (Bite Lamhe), सोनिये (Soniye) यांसारखी हिंदी रोमँटिक गाणी (Romantic Songs) केकेने इमरानसाठी गायली आहेत.

https://twitter.com/SuM1tLohan/status/1531810125807517696

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये