महाराष्ट्ररणधुमाळी

राज्यसभेचा वचपा काढण्यासाठी अजित पवार मैदानात, बैठक झाल्यावर…

मुंबई : (Ajit Pawar On the MLA Election 2022) राज्यातील विधानपरिषदेच्या दहा जागांच्या निवडणूकांच्या निमित्तानं राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. माविआ आणि भाजप यांच्याकडे दहाव्या जागेसाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं दहाव्या जागेसाठी चुरस वाढू लागली आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपनं केलेली खेळी यशस्वी झाली. त्यातून भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. तर यामुळे महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. हा पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद निवडणूकीचे सुत्र स्वतःकडे घेतली आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेचा उमेदवार पडल्यानं महाविकास आघाडीची नाचक्की झाली. त्यामुळे २० जूनला पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीनं सर्व ताकद पणाला लावली आहे. खडसे यांना भाजपमध्ये डावललं गेल्यानं त्यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीच्या तिकीटावर देखील त्यांचा पराभव करून महाविकास आघाडी आणि थेट पवारांनाच आव्हान द्यायचं, प्लॅनिंग भाजपचं आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचं सध्याचं संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा त्यांच्याकडे आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं पारडं अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळं मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. तर दुसरीकडं काँग्रेसला दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अतिरिक्त दहा मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये