पुणे रेल्वे स्थानकावर ‘एआय’ची करडी नजर!
पुणे | Pune News – पुणे (Pune) रेल्वेस्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एआयची करडी नजर राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात अधिकाधिक व्हावा, यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागाला कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते. पुणे विभागाने एकूण सात प्रकल्प मुख्यालयाकडे सादर केले होते. त्यातील टेहळणी यंत्रणेचा प्रस्ताव मुख्यालयाने मंजूर केला आहे. यात स्थानकावर ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसवून टेहळणी केली जाणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मालकीच्या जिओ थिंग्ज लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकात आता कृत्रिम प्रज्ञेची (एआय) नजर राहणार आहे. स्थानकात अत्याधुनिक ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत. कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने हे कॅमेरे स्थानकातील संशयास्पद हालचाली टिपणार आहेत. त्याबाबत ते रेल्वे प्रशासनाला तातडीने माहितीही देणार आहेत. स्थानकावर लवकरच हा ३० दिवसांचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकात आता कृत्रिम प्रज्ञेची (एआय) नजर राहणार आहे. स्थानकात अत्याधुनिक ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत. त्याबाबत ते रेल्वे प्रशासनाला तातडीने माहितीही देणार आहेत.