ताज्या बातम्यामनोरंजन

आली रे आली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीजपैकी एक आहे. अजय देवगणच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ‘सिंघम’ (Singham) या चित्रपटाचे नाव निश्चितपणे टॉप लिस्टमध्ये सामील होईल. अजयने आतापर्यंत सिंघम आणि सिंघम रिटर्न्समधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता अजय देवगण आणि रोहीत शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. या गाजलेल्या सिनेमाचा तिसरा भाग अर्थात ‘सिंघम अगेन’ (Singham Again) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

अजयच्या ‘सिंघम अगेन’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम 2’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून ते आता ‘सिंघम 3’ची प्रतीक्षा करत आहेत.

याआधी रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील शेवटचे दोन भाग ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’ पुढील वर्षीच्या दिवाळीत काय कमाल दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. याबरोबरच रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीर सिंगच्या ‘सिंबा’ आणि अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चीसुद्धा धमाकेदार एंट्री झाली होती. आता सिंघम अगेन चित्रपटात नेमकी कोणती सरप्राइज बघायला मिळणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये