“साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून…”, अजित पवारांचा पुणेरी टोला
नागपूर | Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे ओळखले जातात. ते नेहमीच विरोधी नेत्यांवर त्यांच्या आक्रमक शैलीत टीका करताना दिसतात. मात्र, यावेळी त्यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. आजपासून (19 डिसेंबर) राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी सभागृहाबाहेर अजित पवारांची वेगळीच झलक पाहायला मिळाली.
आजच्या अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी अजित पवार आणि सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यावेळी अजित पवार आणि अतुल सावे यांच्यातील संभाषण चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवार आणि अतुल सावे समोरासमोर येतात तेव्हा अजित पवार आपल्या खास शैलीत सावेंना म्हणतात की, सावे साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदललात की, मी देवेंद्रजींना (Devendra Fadnavis) अनेकदा सांगतो की, सावे साहेबांना सांगा इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते. माणसं जोडायची असतात. त्यावर अतुल सावे म्हणतात, तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे ते.” त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
One Comment