बारामतीत केंद्रीय मंत्र्यापेक्षा, पवारांचीच जनता ‘पॉवर’ जास्त!
बारामती : (Ajit Pawar On Nirmla Sitaraman) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसांचा बारामती दौरा आयोजित करण्यात आला होता. आज त्यांच्या दौऱ्याचा तीसरा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र, यावेळी चर्चा एकाच गोष्टीची सर्वात जास्त होत आहे. कारण पवारांना बारामतीत शह देण्यासाठी भाजपला मोठ्या प्रयत्नाची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील आज बारामतीत आहेत. अजित पवार हे नेहमी सामान्यांच्या प्रश्नासाठी जनता दरबार घेत असतात. अजितदादांचा आज जनता दरबार भरला आहे. या जनता दरबाराला नेहमीपेक्षा दुप्पट नागरिकांनी गर्दी केली. पवारांना भेटण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
त्यामुळे केंद्रीयमंत्री सितारमण यांच्या कार्यक्रमापेक्षा अजित पवारांच्या जनता दरबाराला नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे बारामतीत कुठल्याही पक्षाने निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली तरी पवारांची “पॉवर” राहणार असल्याचे आज दिसून आले आहे.