ताज्या बातम्यारणधुमाळी

“सरकार येत असतात, जात असतात त्यामुळे…”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

मुंबई | Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंद-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारनं दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यावरून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारनं दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही”, असं अजित पवार म्हणाले.

भविष्यातील नवं सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला आहे. तसंच निधी अडवण्याच्या विरोधात काही नेत्यांनी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यातील महाविकासआघाडी सरकारच्या काळातील ५० कोटींच्या विकासकामांना स्थगिती दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार स्थानिक निधी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. राज्य सरकारनं ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या नाहीत, तसंच निविदा प्रक्रिया झाली मात्र काम सुरू करण्याचे आदेश नाहीत, अशी सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये