ताज्या बातम्यारणधुमाळी

“…तर गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे”, अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

जळगाव | Ajit Pawar On State Government – वेदांता-फाॅक्सकाॅन (Vedanta-Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्राकडे येणारी 1 लाख 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदांत समूहानं जाहीर केलं आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग आणि लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावं लागणार आहे. यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर (State Government) हल्लाबोल केला आहे.

“देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 लाख कोटींची गुंतवणूक आणि 2 लाख रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सांगितलं की, तुमचे केंद्र सरकारसह चांगले संबंध आहेत. तुमच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना वेदान्त प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. वेदान्तने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडलं होतं. मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिला आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असेल, तर गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे.” तसंच रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे, असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, “तोही प्रकल्प राज्यात व्हावा. ज्या माध्यमातून राज्याला रोजगार, गुंतवणूक, देशाला आणि राज्याला जीएसटी मिळेल, असे प्रकल्प आले पाहिजे. हे प्रकल्प येताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये”. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये