तुम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्हायचं अन् बाकीच्याचं काय? अजित पवार संतापले

पिंपरी : (Ajit Pawar On State Government) आज घडलेल्या भंडारा सामुहिक बलत्कारावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना घडत असून त्याचे प्रमाण वाढत आहे. या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी सरकारमधील कोणीही लक्ष देत नाही. त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या सर्व मंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी सचिवांना देण्याचे आदेश काढले यावर देखील अजित पवारांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या सचिवांना अधिकार देण्याचे आदेश काढले. हे आदेश ४ ऑगस्टचे आहेत. राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या, महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून जे काही संविधान, कायदा, नियम केले, त्यातून भारत एकसंध राहिला आहे. मात्र इथं निवडणुका होऊ दिल्या जात नसल्याची नाराजी यावेळी व्यक्त केली आहे.
पवार पुढं म्हणाले की, कोर्टाने अनेकदा सांगितंल की, निवडणुका लवकर मार्गी लावा म्हणून सांगितले. पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेत आणि पुणे जिल्हा परिषदेत जागा वाढल्या होत्या. नव्या सरकारनं आता त्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला दोघांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचे आहे. मात्र, बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायच नाही. तिथं मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना द्यायचे. हे कस जमणार, सरकारनं लोकशाहीचा मुडदा पाडल्याचं म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला, ते पिंपरी येथे जाहीर सभेला संबोधित करत होते.