ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

“…नाहीतर आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता”, अजित पवारांनी सांगितला अपघाताचा किस्सा

बारामती | Ajit Pawar Lift Accident – शुक्रवारी (13 जानेवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या लिफ्टला अपघात (Lift Accident) झाला होता. याबाबत अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना माहिती दिली आहे. सुदैवानं बचावलो नाहीतर आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लिफ्ट अपघाताचा किस्सा सांगितला. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये लिफ्टमधील लाईट अचानक गेली आणि चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खालीच गेली. सुदैवानं मी बचावलोय नाहीतर, आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता, असं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले की, “शुक्रवारी मी पुण्यात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. त्या हॉस्पिटलमध्ये चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट घेऊन मी आणि डॉ. हर्डिकर निघालो होतो. डॉ. हर्डिकरांचं वय जवळपास 90 वर्ष. ते म्हणाले आता तिसऱ्या मजल्यावर आलात, तर लिफ्टनं चौथ्या मजल्यावर जाऊयात. त्यावेळी आम्ही दोघं आणि आणखी दोन सिक्युरिटी गार्ड लिफ्टमध्ये होतो. पण लिफ्ट वरती जातच नव्हती. नंतर अचानक लाईट गेली. अंधारच अंधार होता आणि लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन धाडदिशी खाली आली. खोटं नाही सांगत, आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी दरवाजा जोर लावून उघडला. पण मला भिती ती, डॉ. हार्डिकरांची. मी सुनेत्रालाही बोललो नाही, मी आईलाही बोललो नाही आणि मी प्रेसलाही सांगितलं नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये