ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…अन् अजित पवार भाजपबरोबर जाणार”, अंजली दमानियांचं खळबळजनक ट्विट

मुंबई | Anjali Damania – नुकतंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी विरोधी पक्षेनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भातलं एक ट्विट केलं आहे. अजित पवार हे लवकरच भाजपबरोबर (BJP) जाणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज मी मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…तेही लवकरच. त्यामुळे बघू महाराष्ट्राच्या राजकारणाची किती दुर्दशा होतेय.”

दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार खरंच भाजपबरोबर जाणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तसंच या ट्विटवर अजित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये