राष्ट्रवादीच्या शिबीर प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नाव नाही, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई | Ajit Pawar – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. अशातच, आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्या (21 एप्रिल) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबीर प्रसिद्धीपत्रकात अजित पवार याचं नावच नाहीये. त्यामुळे अजित पवारांचं नाव पत्रकात नसल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत विभागीय कार्यकर्ता शिबीर होणर आहे. पण या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवार यांचं नाव नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अजित पवारांचं प्रसिद्धीपत्रकात नाव नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. तसंच अजित पवारांचा उद्या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वनियोजीत कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नसल्याचंही सांगण्यात येतंय.