ताज्या बातम्यारणधुमाळी

“ते टाळलं असतं तर बरं झालं असतं…”, मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | Ajit Pawar’s Reaction On Cabinet Expansion – आज (9 ऑगस्ट) शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हाॅलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही, अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं”,अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवापसी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, तानाजी सावंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले. मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात टीईटी घोटाळ्यात नाव आलेले अब्दुल सत्तार आणि भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपदाचा मान मिळाला. यावरुनच अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये