राज ठाकरेंनी दिला सल्ला अन् अजित पवारांनी तो ऐकला; म्हणाले, “…तसंच मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन”

मुंबई | Ajit Pawar On Raj Thackeary – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे. त्यांनी जसं त्यांच्या काकांवर लक्ष ठेवलं तसंच मी देखील माझ्या काकांवर लक्ष ठेवेन, असं अजित पवार म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत अजित पवारांना सल्ला दिला होता, त्यावर अजित दादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बुधवारी (26 एप्रिल) ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांना काकांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. अमृता फडणवीसांच्या रॅपिड फायर प्रश्नावर राज ठाकरेंनी अजित दादांना सल्ला दिला होता.
राज ठाकरेंनी सल्ला दिल्यानंतर अजित पवारांनीही त्यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. “जसं तुम्ही तुमच्या काकांवर लक्ष ठेवलं, तसंच मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन”, असं अजित पवारांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.