ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपनं लिहिली…”, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई | Sushma Andhare On Devendra Fadnavis – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या होत्या. तसंच अजित पवार हे त्यांच्या पक्षावर नाराज असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या सर्व चर्चांवर पडदा टाकला. तसंच यासंदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या नाराजीनाट्यावरून टीका केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, अजित पवार यांची स्क्रिप्ट भाजपनं लिहिली आहे. महाविकास आघाडीला वज्रमूठ सभा आणि खेड व मालेगाव येथील सभांमधून जो प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे भाजपला भीती वाटत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची अलिकडची विधानं आपण तपासून पाहिली तर ती विधानं पुरेशी बोलकी आहेत. या सगळ्या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस हे कमालीचे मौन बाळगून आहेत. पण त्यांचं हे जे मौन आहे ते खरं रहस्यमयी आहे. त्यामुळे त्यांनी कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवारांच्या नाराजीनाट्याचा स्किप्ट रायटर कोण? याचं उत्तर फडणवीस चांगल्याप्रकारे देऊ शकतात, असं म्हणत सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये