ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘म्हणून’ अक्षय कुमारने मानले पंकजा मुंडेंचे आभार, म्हणाला…

मुंबई Akshaykumar Rakshabandhan : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट रक्षाबंधनच्या दिवशी गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटावर अनेक चित्रपट समीक्षकांनी तसेच कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट पाहिला आहे. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटवर अक्षय कुमारनेही कमेंट केली आहे.

पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधन चित्रपटाच्या निमित्ताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी रक्षाबंधन चित्रपट पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया दिली आहे. “आज रक्षाबंधन…, मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षाबंधन” सिनेमा पाहीला. मला खूप भावला. समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत. कारण त्यांची किम्मत मोजावी लागते. fridge, TV, गाड़ी, status या गोष्टींसाठी आपल्या लाडकीचे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे!”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

“मला वाटतं रक्षाबंधन सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे. कठीण आहे, आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो. नाते फायदा-तोटा यात बसवत असतो. जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा, काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची ! फारच चांगला चित्रपट. फारच चांगला संदेश…अक्षय कुमार सर”, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडेंच्या या ट्विटवर अक्षय कुमारनेही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना अक्षय कुमारने पंकजा मुंडेंचे आभार मानले आहेत. “धन्यवाद पंकजा जी, जरी आम्ही या चित्रपटाद्वारे 5% बदल घडवून आणू शकलो तरीही हा आमच्यासाठी मोठा विजय असेल”, असं अक्षय कुमारने कमेंट करत म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये