ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

ट्रोलिंगवर आलिया भट्ट म्हणाली,”आई होण्याच्या निर्णयाचा मला पश्चाताप…”;

मुंबई : (Alia Bhatt On Motherhood) आलिया भट्टने (Alia Bhatt) लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. 2022 हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरलं आहे. मात्र, या वर्षात तिला नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं असून, या ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे. आलिया म्हणाली,”करिअर चांगलं सुरू असताना मी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा होता”.

आलिया-रणबीरने (Ranbir Kapoor) आपल्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. ते म्हणाली, “लग्नानंतर किंवा आई झाल्यानंतरदेखील माझी कोणतीही गोष्ट बदललेली नाही. कामाला सुरुवात केल्यानंतरही काहीही बदलणार नाही. आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही प्रश्चाताप होणार नाही. माझा निर्णय हा योग्यच आहे”.

पुढे बोलताना आलिया म्हणाली, “मी कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाही. सध्या मी मातृत्वाचा आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यात काम, करिअर हे पहिल्या क्रमांकावरच आहे. पण तुम्हाला वैयक्तिक आयुष्य आणि करिअर या दोन्ही गोष्टींची सांगड घालायला हवी, असं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये