आलिया भट्ट होणार जुळ्या मुलांची आई? रणबीरच्या प्रतिक्रियेनंतर चर्चांना उधाण

मुंबई | Alia Bhatt Pregnancy – बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं काही दिवसांपूर्वीच गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यामुळे रणबीर कपूर आणि आलिया चांगलेच चर्चेत आहेत. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून आलिया भट्ट जुळ्या मुलांची आई होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर रणबीर कपूरनं अशी काही प्रतिक्रिया दिली की सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच दरम्यान रणबीरनं दिलेल्या एका मुलाखतीत दोन सत्य आणि एक खोटी गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे आलिया भट्ट जुळ्या मुलांची आई होणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. या मुलाखतीत रणबीर म्हणाला, “माझी जुळी मुलं आहेत. मी एका पौराणिक चित्रपटात दिसणार आहे. आणि मी कामातून मोठा ब्रेक घेणार आहे”. रणबीरनं दिलेल्या या उत्तरानंतर आलिया आणि रणबीर जुळ्या मुलांचे आई वडील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आता ‘पिंकव्हिला’नं दिलेल्या वृत्तानुसार रणबीरनं नुकत्याच दिल्ली येथे दिलेल्या एका मुलाखतीत प्रमोशनच्या वेळी पसरलेल्या जुळ्या मुलांच्या अफवांवर भाष्य केलं आहे. यावर रणबीर म्हणाला, “यावरून अफवा पसरण्याचं कारण नाही. मला दोन सत्य आणि एक खोटी गोष्ट विचारण्यात आली होती. ते मी सांगितलं, पण आता मी हे सांगू शकत नाही की, यात सत्य काय होतं आणि खोटं काय होतं.”