…त्यामुळे त्यांनी आपले आजोबाही बदलले”, अंबादास दानवेंची गुलाबराव पाटलांवर खोचक टीका
भंडारा | Ambadas Danve On Gulabrao Patil – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या फायद्यासाठी आजोबा बदलले, अशी खोचक टीका अंबादास दानवेंनी केली आहे. तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे. ते भंडाऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, “तुम्ही जर हिंदुत्वाविषयी बोलत असाल तर परवा सांगलीमध्ये साधूंवर हल्ले कसे झाले? तुमचं नेमकं हिंदुत्व काय आहे? शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या वेळी मदत न करणं, हे तुमचं हिंदुत्व आहे. राज्यात ज्या आत्महत्या होतात, त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं हिंदुत्व आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेलं हिंदुत्व हे नाही. प्रबोधनकारांनी सर्वसामान्य माणसाची सेवा करणं हेच खरं हिंदुत्व असल्याचं सांगितलं आहे”.
“तुम्ही यापूर्वीची गुलाबराव पाटलांची भाषणं नीट ऐका. त्यांना शिवतीर्थावर भाषण करायला संधी दिली होती. त्यावेळी गुलाबराव पाटील स्वत: शिवसेनेमध्ये या, बाळासाहेब ठाकरेंकडे या, उद्धव ठाकरेंकडे या…असं म्हणत होते. मात्र, आता त्यांनी बंडखोरी केली आहे. गद्दारी केली आहे. यामुळे त्यांनी आपला आजोबाही बदलला. एकनाथ शिंदे हे त्यांचे आजोबा झाले आहेत”, अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे.