क्रिकेटचं मैदान गाजवलं, आता राजकारण गाजवणार? आंध्राच्या अँग्री यंग मॅनची दुसऱ्या इनिंगची घोषणा..
Ambati Rayudu In Politics : धोनीचा प्रचंड विश्वास असलेल्या अंबाती रायुडूने आयपीएल 2023 च्या फायनलनंतर आपली बॅट खाली ठेवली. त्याने निवृत्तीची घोषणा करत आपली क्रिकेटिंग कारकीर्द संपल्याचे जाहीर केले. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्स विरूद्धची फायनल जिंकून रायुडूला विजेतेपदासह निरोप दिला. या घटनेला महिना होतो न होतो तोच अंबाती रायुडूने आपल्या दुसऱ्या इनिंगची घोषणा देखील केली.
अंबाती रायुडूने आंध्र प्रदेशमधील स्थानिक माध्यमांना तो लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात उडी घेणार असल्याचे सांगितले. 37 वर्षाचा रायुडू म्हणाला की, ‘मी आंध्र प्रदेशच्या राजकाणात लवकरच प्रवेश करणार आहे.
मात्र त्यापूर्वी मी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देणार आहे. मला लोकांची भावना आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत.’ मुळच्या गुंटूरच्या असलेल्या रायुडूने मुतलुरू गावातील वाट्टीचेरूकुरू या ब्लॉकला भेट दिली. यावेळीच त्याने हे वक्तव्य केले.