Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे भाजप नेत्याच्या फर्मच्या उद्घाटनाला; पुन्हा चर्चा, नेमका विषय काय?

जालना : (Amol Kolhe In Jalana With Raosaheb Danve) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत (Rashtrawadi Congress) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते राष्ट्रवादीच्या महत्वाच्या कार्यक्रमांना देखील अनेक दिवसांपासून गैरहजर राहताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांची भाजप BJP Maharashtra) सोबत जवळीक वाढत असल्याच्या देखील चर्चा सुरु होत्या. त्यावर त्यांनी स्वतः नाराजी वगैरे काहीही नसल्याचं म्हटलं स्पष्ट केलं होतं. मात्र, आज पुन्हा एकदा त्या चर्चांना उधान आलं आहे. अमोल कोल्हे हे हिंगोलीत भाजप नेते केंदीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका फर्मच्या उद्घाटनासाठी उपस्थित दिसले. (Amol Kolhe In Jalana With BJP’s Raosaheb Danve)

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे बंधू भास्कर पाटील दानवे (Bhaskar Patil Danve) यांच्या करेज इन्फ्रा प्रा.लि.जी कंपनीच्या ऑफिसच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन जालन्यात करण्यात आले होते. या कर्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी ही उपस्थिती होती. अमोल कोल्हे आज रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी प्रतीक दानवे यांच्या ‘करेज’ फर्मचे उद्घाटन केले. मात्र भाजप नेत्याच्या फर्मचं उद्घाटन अमोल कोल्हे यांनी केल्याने चर्चा तर होणारच. यावेळी रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अमोल कोल्हे यांची भाजपची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या सर्व चर्चा खोट्या असल्याचं स्वत: अमोल कोल्हे यांनी अनेकदा स्पष्ट केलंय. पण काही घटना वारंवार अशा घडत आहेत की अमोल कोल्हे आणि भाजप यांच्यातील संबंध आणखी दृढ होत असल्याच्या चर्चांना खतपाणी घातलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये