ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अमित शहांना भेटीला, राजकीय चर्चेला उधाण!

नवी दिल्ली : ( Amol Kolhe Meet Amit Shah In Delhi ) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली या ठिकाणी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली.

संसदेत सरकारच्या विरोधीत स्पष्ट भूमिका मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सभागृहात टीकास्त्र सोडणारे डॉ. कोल्हे यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शिरुर लोकसभा मतदारसंघ जिंकायचा म्हणून भाजपच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग कोल्हे यांच्या मतदारसंघात गेल्या काही दिवसांत तळ ठोकून होत्या. तर दुसरीकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये