गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून मिटकरींचं कृषीमंत्र्यांवर टीकास्र म्हणाले, “सत्तारांमध्ये लाज, लज्जा, शरम…”

वाशीम : (Amol Mitkar On Adbul Sattar) शिंदे-फडणवीस सरकार मधील कृषीमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी सत्तेचा दुरुपयोगी करून वाशीम शहराला लागून असलेली 37 एकर गायरान जमीन एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेतून उघड झाला होता. हा मुद्दा आज विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळालं. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीकस्त्र सोडलं. ते म्हणाले, सत्तारांमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. सत्तारांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही चहा घेता की दारू, असी विचारणा केली होती. हे तेच अब्दुल सत्तार आहेत, ज्यांनी हिंदुत्त्वाच्या नावाखाली मंत्रीपदासाठी उद्ध ठाकरेंशी गद्दारी करून गुवाहाटीला गेले. हे तेच अब्दुल सत्तार आहेत, ज्यांनी सुप्रिया सुळेंविरोधात अत्यंत खालच्या कोट्यवधींची सपत्ती गोळा गेली.
गायरान जमीन वाटप करण्याचा अधिकार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला नसताना, आपल्या पदाचा गैरवापर करून वाशिममधली 37 एक्कर जमीन अवैधरित्या वाटलेली आहे. त्यामुळे जर अब्दुल सत्तार यांच्यात लाज, लज्जा, शरम या तिन्ही गोष्टी शिल्लक असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात हा वाद जास्तच चिघळण्याची शक्यता आहे.