ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘शेण खाण्याची परंपरा सुरूच’; दानवेंनी शिवरायांच्या एकेरी उल्लेखाने मिटकरी भडकले!

जालना : (Amol Mitkari On Raosaheb Danve) भाजप नेत्यामध्ये जणू काय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. शिवरायांवर बोलण्याची मालिका कायम राहिल्याने राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलं आहे. राज्यपाल कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार गायकवाड, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपचे नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे.

दरम्यान, शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं यावरून वाद निर्माण झाला होता. हा विषय मागे पडत नाही त्याआधीच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. दानवे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे.

यानंतर अमोल मिटकरी यांनी व्हिडिओची क्लिप शेअर करत म्हटलं की, “भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली. आत्ता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा “शिवाजी” असा एकेरी उल्लेख.. भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली, याचा आणखी एक पुरावा.” तसंच त्यांनी दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये