“भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढलाय”; वेस्ट इंडीजच्या दिग्गज माजी खेळाडू राॅबर्टस्’ने का केलं असं वक्तव्य

Andy Roberts on Team India : काही दिवासांपूर्वी पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप भारताचा दारूण पराभव झाला. या पराभवाचा धक्का भारतीय टीमच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पुढील महिन्यात वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया (Team India) यावेळी दोन टेस्ट, तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज किक्रेटपटू अंडी रॉबर्टस् यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रॉबर्टस् यांने म्हटलं आहे की, भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढला आहे. त्यांनी इंडियाच्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीम इंडियाच्या पराभनानंतर अँडी रॉबर्ट्स यांनी भारतीय पुरुष संघावर टीका केली आहे.
रॉबर्टस् यांनी म्हटलं आहे की, ”भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना अहंकार चढला आहे. यामुळे ते जगातील इतर संघांना कमी लेखत आहेत. भारतीय संघाला त्यांचं लक्ष केंद्रीत करावं लागेल. टेस्ट क्रिकेट की टी-20 क्रिकेट यामधील नेमकं एक ठरवावं लागेल. टी20 क्रिकेट सुरुच राहिल. त्यासाठी स्पर्धा नाही.”
अँडी रॉबर्ट्स यांनी 1970 आणि 1980 च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या धडक गोलंदाज होता. रॉबर्ट्स यांनी म्हटलं आहे की, “भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण त्यांनी देशाबाहेर चांगली कामगिरी केलेली नाही. मला अपेक्षा होती की भारताने त्यांचे फलंदाजीतील पराक्रम दाखवावे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या अंतिम फेरीत मला कोणतेही चमकदार स्पॉट्स दिसले नाहीत.”