देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; CBI ची याचिका फेटाळली, ‘या’ दिवशी होणार सुटका!
मुंबई : (Anil Deshmukh Case) अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हायकोर्टाचा (High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या (Anil Deshmukh Bail) स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची (CBI) मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. त्यामुळे देशमुखांचा कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली होती.
सीबीआयनं न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. अखेर आज हायकोर्टानं जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.