भारतीय अंजू बनली पाकिस्तानी फातिमा, प्रियकर नसरूल्लासोबत तिनं लग्न केलं अन्…
कराची | Anju Love Story – राजस्थानची अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (Anju) ही तिच्या सोशल मीडियावरील प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेली आहे. अंजू ही तिचा पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. तर आता अंजूनं पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने तिचा प्रियकर नसरूल्लासोबत लग्न केलं आहे. तसंच तिनं इस्लाम धर्म देखील स्वीकारला आहे. त्यामुळे आता अंजू ही फातिमा बनली आहे. तिनं तिचा फेसबुक फ्रेंड नसरूल्लासोबत लग्न केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अंजू ही फेसबुकवरून पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरूणाशी बोलत होती. त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू ही लाहोरमध्ये खैबर पख्तून परिसरात नसरूल्लाह नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचं एक पत्र मिळालं आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अशातच आता अंजूनं लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.