“तो आला, आम्ही बघितलं अन्…”, अनुपम खेर यांची नीरज चोप्रासाठी भन्नाट पोस्ट
मुंबई | Anupam Kher Congratulated Neeraj Chopra – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद (Athletics Championship) स्पर्धेत रौप्यपदकाची (Silver Medal) कमाई केली आहे. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. यामध्ये आता अभिनेते अनुपम खेर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. त्यांची ही भन्नाट पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “तो आला, आम्ही बघितलं…तो परत जिंकला! जय हिंद!,” त्यांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. तसंच युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. तसंच रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं.
दरम्यान, अनुपम खेर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास अनुपम खेर त्यांच्या ‘कश्मीर फाईल’ चित्रपटानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. अनेकांनी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेचं कौतुक केलंय तर अनेकांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.