ताज्या बातम्यामनोरंजन

IPL काळात विराट अनुष्काचा भन्नाट डान्स; पुढे विराटसोबत जे घडलं…

मुंबई | सध्या देशभरात आयपीएलची (Indian Premier League) क्रेझ पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (Royal Challengers Bangalore) या संघानं आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. पण सध्या विराट कोहली हा क्रिकेटमुळे नाही तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. विराट-अनुष्काने (Anushka Sharma) एक कमाल व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का हे एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते दोघेही एकदम कॅज्युअल लूकमध्ये आहेत. तर जिममध्ये त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. विरुष्का या व्हिडिओमध्ये एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसले. यावेळी एक स्टेप अशी होती की ज्यात पाय ढोपरात दुमडून डान्स करायचा होता. बॉलिवूड अभिनेत्री असणारा अनुष्काने ही डान्स स्टेप अगदी योग्य केली. तर ‘पंजाबी मुंडा’ विराटही चांगल्या पद्धतीने डान्स मुव्ह करत होता, पण फार काळ तो ती स्टेप करू शकला नाही आणि त्याच्या पाय दुखू लागला.

अनुष्कानं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘भावा, नीट डान्स कर तुला दुखापत झाली तर आरसीबीचं काय होईल.’ तर दुसऱ्या युझरनं क्युट.’ अशी कमेंट केली. अनुष्कानं शेअर केलेल्या या व्हिडीओला 7 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक मिलियपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं असून 17 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये