अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चा अन् विराट घाईत मुंबईत परतला; नेमकं काय आहे कारण?
मुंबई | Virat Kohli – सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर अनुष्का प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, अद्याप याबात विरूष्कानं कोणतंही स्पष्टीकरण दिलंल नाहीये. एकिकडे या चर्चा सुरू असतानाच आता विराट कोहली तातडीनं मुंबईला परतला आहे.
विराट कोहली वर्ल्ड कप 2023 साठी गुवाहाटीमध्ये वॉर्म-अप मॅचमध्ये व्यस्त होता. तर आता तो अचानक मुंबईला परतला आहे. पर्सनल इमर्जन्सीचं कारण देत विराट मुंबईला परतल्याचं समजतंय. तसंच अनुष्काला भेटण्यासाठी विराट मुंबईमध्ये इमर्जन्सी फ्लाइटने आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, अनुष्का आणि विराटला पहिली मुलगी वामिका आहे. तर वामिकानंतर आता पुन्हा एकदा विरूष्काच्या घरी आणखी एका नवीन सदस्याची एन्ट्री होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या बाळासाठी आनंदी आहेत. पण अद्याप विरूष्कानं याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाहीये.