दुष्काळग्रस्त भागातील अर्चना महादेवची मोठ्या पडद्यावर उतुंग भरारी
घोडा आणि मसुटा चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत
(Archana Mahadev’s new movie released) स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी हा क्षण येतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यांतून आलेल्या अर्चना महादेव हिने खडतर परिस्थितीवर मात करीत, जिद्दीने हे यश खेचून आणलं आहे. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले ‘घोडा’ आणि ‘मसुटा’ हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.
स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी हा क्षण येतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यांतून आलेल्या अर्चना महादेव हिने खडतर परिस्थितीवर मात करीत, जिद्दीने हे यश खेचून आणलं आहे. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले ‘घोडा’ आणि ‘मसुटा’ हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.
आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण एखादी भूमिका करायची असेल तर अभिनय करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या लोकांचा अभ्यास हा त्यांच्यासोबतच राहून करावा लागतो असे अर्चना म्हणाली आहे. आर्चना महादेवची मुख्य भूमिका असलेल्या ‘घोडा’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट ज्यूरी अवॉर्ड’ तर ‘मसुटा’ या चित्रपटाला विविध महोत्सव, पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे.