‘अच्छे दिन कुठे आहेत?’ रुपाली ठोंबरेंचा मोदी सरकारवर निशाणा
पुणे : राष्ट्रवादी काँगेसच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे यांनी आज ट्वीट करत अच्छे दिन कुठे आहेत असा थेट प्रश्न मोदीजींना विचारला आहे.तसंच त्यांनी ट्वीटमधून महागाईवरही भाष्य केलं आहे.रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महागाई दराची तुलना केली तर ग्रामीण भागात महागाई दर ७.६६ वरून ८.३८ वर पोहोचला आहे. याचप्रमाणे शहरी भागात महागाई दर ६.१२ वरून ७.०९ झाला आहे. तर मग अच्छे दिन कुठे आहेत? कधी येणार अच्छे दिन? असा सवाल करत त्यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे.
तसंच महागाई दरात वारंवार वाढ होत असून एप्रिल महिन्यात हा दर ७.७९ इतका झाला आणि मार्चमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचप्रमाणे लोकांनी २०१४ ला महागाईचा भडका झाला होता म्हणून भाजपला सतेत आणलं परंतु आजही अशीच परिस्तिथी असल्याचं दिसून येत आहे असा टोला रुपाली ठोंबरेंनी केंद्रसरकार आणि भाजपला लगावला आहे. एप्रिमध्ये महागाई दर ६.९५ वरुन ७.७९ वर पोहोचला असून एका महिन्यात १ टक्काने वाढ झाली आहे. दरम्यान एप्रिल २०२१ मध्ये महागाई दर फक्त ४.२३ टक्के इतका होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाई दरात ५.५६ टक्क्यानी वाढ झाली आहे असं ही त्या म्हणाल्या.