ताज्या बातम्यामनोरंजन

Happy Birthday | रोमँटिक गाण्यांचा बादशहा अरिजित सिंहची ही टॉप 10 गाणी तुम्ही ऐकली पाहिजेत

Happy Birthday Arijit Singh : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंहचा (Arijit Singh) आज वाढदिवस आहे. तो आपल्या मधूर आवाजाने सर्वांच्या हृदयावर राज्य करतो. ‘सांवरिया’ चित्रपटातील गाण्यांनी करिअरची सुरुवात करणारा अरिजित सिंह ‘आशिकी-२’मधील गाण्यांनी रातोरात स्टार झाला. यानंतर अरिजितला रोमँटिक गाण्यांचा राजा म्हटले जाऊ लागले. अरिजितच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या आत्तापर्यंत गाजलेल्या 10 गाण्यांबद्दल.

फिर ले आया दिल

अनुराग कश्यपच्या ‘बर्फी’ या सिनेमातील ‘फिर ले आया दिल’ हे गाणं अरिजित सिंहने गायलं आहे. अरिजितच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत या गाण्याचा समावेश होतो. या गाण्याचे बोल संगीत प्रीतमने लिहिले आहेत.

कबीरा (ये जवानी है दीवानी)

रेखा भारद्वाज आणि अरिजित सिंह यांचं ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातील ‘कबीरा’ हे गाणं चांगलचं लोकप्रिय आहे. या गाण्यात रणबीर आणि दीपिकाचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळाला होता.

मस्त मगन (2 स्टेट्स)

‘2 स्टेट्स’ या सिनेमातील ‘मस्त मगन’ हे गाणं चिनमय आणि अरिजित सिंहने गायलं आहे.

जुदाई (बदलापुर)

जुदाई हे गाणं डोळ्यात पाणी आणणारं आहे. अरिजित सिंह आणि रेखा भारद्वाजचा आवाज या गाण्याला लाभला आहे.

चन्ना मेरेया (ए दिल है मुश्किल)

अरिजित सिंहचं ‘चन्ना मेरेया’ हे गाणं खूपच लोकप्रिय आहे.

तुम ही हो (आशिकी 2)

अरिजित सिंहच्या सुपरहिट गाण्यांमध्ये ‘आशि

दुआ (संघाई)

दुआ हे गाणंदेखील अरिजितच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

गेरूआ

अरिजित सिंहचं ‘गेरूआ’ हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

इलाही (ये जवानी है दीवानी)

अरिजीत सिंहने आपल्या खास अंदाजात ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातील इलाही हे गाणं गायलं आहे.

नशे-सी-चढ गई (बेफिक्रे)

अरिजितच्या ‘नशे-सी-चढ गई’ या गाण्याचा समावेश त्याच्या सुपरहिट गाण्यांमध्ये केला जातो.

अरिजित सिंहच्या ‘फिर भी तुमको चाहूंगा’, ‘पछताओगे’, ‘पल’, ‘खैरियत’, ‘सोच ना सके’, ‘इलाही’, ‘हमारी अधुरी कहानी’ या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये