अशा प्रकारे श्रद्धा कपूरने पुण्यात साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे

पुणे | अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी नेहमीच ओळखली जाते. वेशभूषा असो नाहीतर खाद्यपदार्थ; तिला मराठी संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. आता नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात ती मिसळ आणि वडापावचा आस्वाद घेताना दिसतेय. श्रद्धाचा आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याची चर्चा सर्वत्र रंगत असतानाच, या सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने पुणेकरांना भेट दिली. अशातच, व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस सेलिब्रेट केला आहे.
श्रद्धा पुण्यात आल्याचा कळताच तेथील चाहत्यांनी तिच्या गाडीभोवती घोळका केला. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप प्रयत्न करत होते. चाहत्यांची गर्दी इतकी जमली की तिच्या गाडीला वाट काढणंही कठीण झालं होतं. अखेर श्रद्धा तिला पोहोचायचं असलेल्या ठिकाणी पोहोचली आणि चित्रपटाचं प्रमोशन केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्यानंतर श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध मिसळीचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर तिने पुण्यात गेल्यावर वडापावही खाल्ला. वडापाव खातानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने लिहिलं, “आयुष्यभरासाठीचा माझा व्हॅलेंटाईन…”
लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.