अर्शदीप सिंगचा लाजिरवाणा विक्रम; अन् भारताला पत्कारावा लागला पराभव!
रांची : (Arshdeep Singh News Record) शुक्रवार दि. 27 रोजी रांचीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २१ धावांनी दारुन पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फंलदाजी करत १७६ धावा केल्या. मात्र, त्याला कारणीभूत ठरला तो वेगवान गोलंदाज गोलंदाज हर्षदीप सिंग. कारण 160 धावांवर किवींचा डाव पोहोचेल असे वाटत असताना अखेरच्या षटकात किवींनी २७ धावा वसुल केल्या अन् याच 27 धावा भारताच्या पराभवाचे कारण ठरल्या.
अर्शदीपने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला आणि डिरेल मिशेलने षटकार मारला. त्यानंतर २ षटकार आणि १ चौकारासह 27 धावा पुर्ण केल्या. या खराब ओव्हरनंतर अर्शदीपने एक नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०व्या षटकात सर्वात जास्त धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी हा नकोसा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता.
अखेरच्या १८ चेंडूत भारताला ५० धावांची गरज होती आणि सुंदर चांगली फटकेबाजी करत होता. अशात १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप बाद झाला आणि त्याच्या जागी अर्शदीप फलंदाजीला आला. त्याचे काम इतक होते की एक धाव घेऊन सुदंरला स्ट्राइक द्यायचा. पण त्याला लॉकी फर्ग्यूसनच्या ५ चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. १८वे षटक निर्धाव गेले. टीम इंडियाला १२ चेंडूत ५० धावा हव्या होत्या. तेव्हा सुंदरने २९ धावा केल्या. जर सुंदरला १८व्या षटकात स्ट्राइक मिळाला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.