“दादा बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात; पण…” अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

पुणे : (Amit Shah On Ajit Pawar) सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच अमित शाह यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच पुण्यात आलोय आणि पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आहोत. दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला.
पुढे बोलताना शाह म्हणाले, सहकार विभागाचे संपूर्ण पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेचा संकल्प घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी फक्त 9 वर्षात सगळं काम एकाच क्षणात करुन टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले.
म्हणजे एकट्या महाराष्ट्रात 42 टक्के सहकारी संस्था आहेत. एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असं चित्र आहे, असं म्हणत शाह यांनी राज्याचं कौतुक केलं. सहकार विभागाचं काम संगणीकृत केलं जाणार आहे. त्यासाठीच डिजिटल पोर्टल आणलं जात आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आवश्यक आहे, त्यासाठीच हा प्रयत्न असल्यातं शाह म्हणाले.