
पुणे : जागतिक संधिवात दिनानिमित्ताने संधिवात आजाराबद्दल समाजात जनजागृती निर्माण होण्यासाठी अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस वेलफेअर सोसायटीच्या वतीने जागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.
संधिवाताबद्दल माहिती मिळणे हा या मागचा हेतू आहे. संधिवातापासून येणाऱ्या आजाराबद्दल जे अपंगत्व येते त्यावर इलाज केला जाऊ शकतो, अशी माहिती डॉ. प्रवीण पाटील यांनी पुणे येथील नीतू मांडके सभागृह टिळक रस्ता येथील आयोजित बैठकीत दिली. जागतिक संधिवात दिनानिमित्त अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस वेलफेअर सोसायटीतर्फे जनजागृती रॅली आणि व्याख्यानाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात महाराष्ट्रातून विविध भागातील रुग्ण सहभागी झाले होते. सदरील व्याख्यानमाला तीन सत्रांमध्ये पार पडली. ज्यात तज्ञ डॉक्टरांचे व्याख्याने होती.
व्याख्यानादरम्यान असलेले रुग्णांमध्ये समज गैरसमज याबद्दल विस्तृत चर्चा झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. कार्यक्रमास, डॉ. मनीष दस्ताने, डॉ. प्रवीण पाटील, प्राची भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराजा सूर्यनारायणाप्पा तसेच अमित पोळ
यांनी केले.