आर्यन खानची केस समीर वानखेडेंची पाठ काही सोडेना; ‘या’ ठिकाणी करण्यात आली बदली!

मुंबई | Sameer Wankhede Transfer | नुकतीच अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चेन्नई (Chennai) येथे बदली करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) क्लीन चिट (Clean Cheat) दिल्याच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची केंद्रीय महसूल सेवा मंत्रालयाने चेन्नई येथे बदली केली आहे.
समीर वानखेडे यांची केंद्रीय करदाते सेवा संचालनलायमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रिय महसूल मंत्रालयाअंतर्गत करदाते सेवा विभाग काम करतो. हा तुलनेने कमी महत्त्वाचा विभाग मानलो जातो. २००८ च्या बॅचचे आयआरएस आधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करताना त्यांना हे साइड पोस्टिंग दिल्याचं बोललं जातं.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी सकाळी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. मी एखाद्या नकारात्मक गोष्टीवर अडकून पडत नाही. यामुळे प्रगती खुंटते. पुढे जाण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार करावा, असं वानखेडे यांनी ट्विटमध्ये लिहीलं आहे. तसंच आर्यन खान प्रकरणामध्ये सदोष तपास केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याच अनुषंगाने त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू आहे.