Top 5इतरताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का?; आशिष शेलार

मुंबई :

‘एक सही भविष्यासाठी’ भाजपच्या या नव्या उपक्रमावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद मध्ये विविध मुद्द्यांवर यावेळी भाष्य केलं. राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? असा सवालही उपस्थित करत ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे.

जगात नामवंत असणारी आयआयएम 350 जागा घेऊन मंजूर झालं आहे. येणाऱ्या अधिवेशनात ते मंजूर होईल. राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? खोट्या बातम्या लगेच सांगता मग आता बोला ना… मुंबईमधून प्रकल्प गेले तेव्हा हे गेलं, ते गेलं हे राजकीय स्वार्थपोटी सांगितलं गेलं. पण मुंबईमध्ये आयआयएम येत आहे तर सगळे गप्प का आहेत? मुंबईवर याचं पुतना मावशीसारखं प्रेम आहे, असं म्हणत आशिष शेलार यांन विरोधकांना टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी देश घडवण्याचं काम करत आहेत. सोमवारपासून भाजप प्रत्येक कॉलेजवर विद्यार्थ्यांसाठी एक अभियान राबवणार आहे. एक सही भविष्यासाठी हा उपक्रम भाजप मुंबईत राबवणार आहे, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे.

ज्यानं कावीळ झाली आहे त्यांना सगळं पिवळंच दिसतं. आदित्य ठाकरे यांना काही होऊ नये. पण त्यांना राजकीय कावीळ झाली आहे हे खरं आहे. आदित्य ठाकरे यांनी सगळे निर्णय विद्यार्थ्याच्या विरोधात घेतले होते. ते सगळे तुघलकी निर्णय होते. अशी घणाघात टीका आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये