“ते गळे काढणार मुंबई आमची अन् तिजोरी भरणार…”, आशिष शेलारांचं टीकास्त्र

मुंबई | Ashish Shelar On Uddhav Thackeray – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोनामुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील मालमत्ता कराचा दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यादरम्यान, आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ठाकरे सरकारनं बिल्डर, दारूवाले, बारवाले, हाॅटेल मालकांवर सवलतींची खैरात केली होती. तर शिंदे-फडणवीस सरकारनं मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ होणार नाही याची काळजी घेतली. मुंबईकर हो, फरक बघा. ते गळे काढणार…मुंबई आमची…मुंबई आमची तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची!”
दरम्यान, कोरोना काळात सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्यानं मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुंबईकर, विविध संस्था, लोकप्रतिनिधींकडून महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्याची दखल पालिकेनं मालमत्ता कराचे दर सध्या आहे तेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्याबाबतच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.