एकनाथ शिंदेवर बंडाची वेळ का आली? नारायण राणेंनी सांगितलं कारण!

मुंबई : (Nayaran Rane On Eknath Shinde) विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळं राज्यात राजकीय भुकंप झाला. आता शिंदेवर बंड पुकारण्याची वेळ का आली, यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे.
दरम्यान राणे म्हणाले, शिंदेला वारंवार अपमानास्पद करण्यात आलं, तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो, असं सांगुन निवडणुकीत खर्च करायला सांगायचं आणि फसवणूक करायची यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला अन् त्यांनी बंड पुकारलं आहे. असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
राणे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेत एकनाथ शिंदेना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आज एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे लागलं आहे. शिंदे यांना वारंवार शिवसेनेत अपमानास्पद वागणूक मिळाल्यानं त्यांनी हे बंड केलं आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.