क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भर पावसात पाकिस्तानला फुटला घाम; सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार?

Asia Cup 2023 PAK vs SL Rain : आशिया कपमधील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 चा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आशिया कपची फायनल खेळण्यासाठी दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे. मात्र नाणेफेकीपूर्वीत कोलंबोमध्ये तुफान पाऊस सुरू झाल्याने दोन्ही संघ पॅव्हेलिनयमध्येच बसून आहेत.

जरी दोन्ही संघांना विजय गरजेचा असला तरी पाऊस सर्वात जास्त नुकसान हे पाकिस्तानचं करणार आहे. कारण भारताविरूद्ध पाकिस्तानचा 228 धावांनी दारूण पराभव झाल्याने त्यांचे नेट रनरेट कोलमडले आहे. याचा फायदा श्रीलंकेला होऊ शकतो. त्यामुळे बाबर सेना पाऊस जाण्यासाठी प्रार्थना कतेय.

आशिया कपच्या सुपर 4 फेरीत दोन्ही संघांनी दोन – दोन सामने खेळले असून त्यातील प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. जर पाऊस झाला आणि सामना रद्द करावा लागला तर सरस नेट रनरेटच्या आधारावर श्रीलंका फायनलमध्ये पोहचेल. पाकिस्तानला जर भारतासोबत फायनल खेळायची असेल तर त्यांना सामना जिंकणे हा एकमेव पर्याय आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये