ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“छत्रपती संभाजी महाराजांना शोभा…” प्राजक्ता गायकवाडची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

पुणे : (Chhatrapati Sambhaji Maharaj death anniversary prajakta gaikwad viral post) आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हुशारी, पराक्रम आणि अन्याय सहन न करण्याची त्यांची लढाऊ वृत्ती अशा अनेक गोष्टी गेल्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या गोष्ट आहेत. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी महाराष्ट्राच नव्हे तर देशभरातील तमाम जनता त्यांचं स्मरण करत आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) खास पोस्ट शेयर केलीय जी चर्चेत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या अभिनेते अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी या महानाट्यात अभिनय करत आहे. प्राजक्ता या नाटकात संभाजी महाराज्यांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. प्राजक्ताने याच नाटकातील एका खास प्रसंगांचा फोटो शेयर करत पोस्ट लिहिली आहे कि, अंगणाला शोभा तुळशीची, म्यानाला शोभा तलवारीची, भगव्याला शोभा पराक्रमाची.‌. आणि छत्रपती संभाजी महाराजांना शोभा महाराणी येसूराणी साहेबांची.. प्राजक्ताच्या या फोटो आणि पोस्टवर तिच्या फॅन्सनी पसंती दर्शवली असून सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण केले आहे.

प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सुद्धा अमोल कोल्हेंसोबत अभिनय केला होता. याही मालिकेत अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकले तर प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये