ताज्या बातम्यापुणे

शिरुर तालुक्यातील केंदुर गावात दारू विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी

शिरूर तालुक्यातील केंदुर गावांमध्ये आडवी बाटली असुनही दारु विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, तालुक्यात खळबळ उडाली असतानाच, यापुर्वी तालुक्यात दारुबंदी बाबत मोठे आंदोलन करणारे भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी हा विषय पुन्हा एकदा हातात घेऊन सर्वच शासकीय विभागांना लेखी पत्र लिहिले आहे.

तालुक्यातील अवैध, बेकायदेशीर व बनावट दारू विक्री करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई, दारु विक्री करणाऱ्या बांधकामांवर कारवाई करावी यासह अनेक मागणीसाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरूर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनला, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.

शिरूर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बनावट दारु विक्री करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रती रांजणगाव एमआयडीसी, शिरूर व शिक्रापूर पोलीस स्टेशनला देण्यात आल्या आहेत.

शिरुर शहरासह शिरूर तालुक्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पाचंगे यांच्याकडे केल्या आहेत. यात महत्वाचे व गंभीर बाब म्हणजे बनावट बाटलीबंद दारु ची मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या विक्री सुरू आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. तसेच मान्यताप्राप्त दारु दुकानांमधून सुद्धा अल्पवयीन मुलांना दारु विक्री होत आहे. तरी पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर निर्णय घ्यावा. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात यावी.

पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक हाटेल, टपऱ्या मधुन अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी व अवैध दारू विक्री बाबत स्वतंत्र हेल्पलाईन नंबर उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी, अध्यक्ष व्यसन मुक्ती तथा दारुबंदी समीती, शिरुर. बाळासाहेब मस्के, शिरूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे संजय पाचंगे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये