ताज्या बातम्यामहाराष्ट्र

Latur News: पंकजा मुंडेंच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर | पन्नगेश्वर साखर कारखान्यात (Pannageshwar Sugar Mills) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या 33 महिन्यांपासून पन्नगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पगार थकला आहे. त्यामुळे पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. थकीत पगार मिळावा यासाठी कर्माचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल, डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

हा साखर कारखाना भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तर या घटनेनंतर पोलिसांनी 24 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचा आणि इलेक्ट्रीशियन वायरमन यांचा 33 महिन्यांपासून पगार थकीत आहे. याबाबत प्रशासनाला कळवून देखील पगार मिळू शकला नाही. तसंच पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू होता. तर कर्मचाऱ्यांनी पगार आणि ईपीएफ जमा व्हावा अन्यथा कारखान्याच्या गेटसमोर आत्मदहन करण्याचा इशारा साखर जिल्हाधिकारी, आयुक्त आणि तहसीलदारांसह कारखाना प्रशासनास एका निवेदनाद्वारे दिला होता.

कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतरही कारखाना प्रशासनानं कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी पोलीस हजर होते त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये