माय जर्नीशिक्षणसक्सेस स्टोरी

कलेने त्यांना घडवले…

प्रत्येक कलाकार हा वेगळा असतो तो त्याच्या अभिनयाने प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो तर कधी सुख-दु:खाच्या छटा देखील आपल्या कलेतून मांडत असतो. आपलं दुःख काळजाच्या कोपऱ्यात लपवून इतरांनच्या चेहऱ्यावर हसू आणनारे असे सहनिर्माते (वेब सिरीज अँड शॉर्ट फिल्म) म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे अमोल भोंगळे. ते पुण्यामध्येच लहानाचे मोठे झाले. त्यांनी प्राथमिक पुण्यातील सरस्वती मंदिर प्राथमिक विदयलायात शिक्षण घेतलं.अमोल याचे वडील MSEB मध्ये कामाला होते. त्यांचे वडील वारल्यामुळे जवाबदारी अमोल भोंगळे यांच्यावर आली. त्यानंतर त्यांना वडिलांच्या जागी 10 वी पास झाल्यानंतर MSEB मध्ये नोकरी मिळाली. तब्बल आठ वर्ष त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली परंतु काही कारणांमुळे त्यांनी ती नोकरी सोडली. तसेच त्यांचे मामा संजय धनवट ( D.S.I) असून मामांनी याच कुटूंबाचा सांभाळ केला.

अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं काही काळ अभिनय केल्यानंतर त्यांना समजलं की मी कास्टिंग उत्तम करू शकतो यामुळे त्यांनी कास्टिंगच काम करायला सुरुवात केली.हे करत असताना चित्रपटविश्व याची खरी ओळख त्यांना अर्जुन फिल्म्स अँड प्रॉडशन्सचे Producer डायरेक्टर त्रिलोकसिंग राजपूत यांनी करून दिली. आजही अमोल भोंगळे हे राजपूत सरांना आपले गुरू मानतात. फिल्म इंडस्ट्री मधले त्यांचे ते गॉडफादर आहेत

तसच एक उत्तम अभिनेता म्हणून अमोल त्यांनी हिंदी वेब सिरीज मध्ये काम केलं आहे यात बुडड्डा, आगामी हे चित्रपट असून यात त्यांनी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं. लूज कंट्रोल,ओम शांती, सीबीआय ऑपरेशन मीरा (आयटम सॉन्ग रोल), राइट या राँग हिंदी चित्रपट मध्ये काही पात्र त्यांनी केली आहेत. तसंच लघुपट शिवशाई, गोल्फ ऑईल,त्याचिट्टी, एक मराठा लाख मराठा, गणेश जनजागृती यानंतर त्यांनी संगीत अल्बम तुझा महिमा (सिंगरचे कास्टिंग केले आहे) सोबतच मॉडेल समन्वयक,चित्रपट उद्योग,निर्माता,सेलिब्रेटी मॅनेजमेंट, आयोजक, मॉडेलिग, जिम कोच,ग्रीन बेल्ट (कराटे) अश्या क्षेत्रात काम करणारे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून त्याना ओळखलं जातं.

आता पर्यंत अमोल यांनी 45 फॅशन शो मध्ये ज्युरी म्हणून अनेक मॉडेल याना V.I.P Guest असे काम मिळून दिले आहे. Event माध्यमातून मॉडेल आणि सोशल महिला याना अवॉर्ड पण मिळुन दिले आहे. त्यांनी एक कास्टिंग डायरेक्टर असून माज चित्रपटात कास्टींग केलं आहे. पुण्यामध्ये कॅरेक्टर कास्टींगचे काम करतात. तर या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना ते सांगू इच्छितात की,कष्ट करा,अनुभव घ्या,आपलं कुटुंब आपल्या सोबत असलं पाहिजे. फिल्म्सचे शूटिंग करताना आपले घरातील एक व्यक्ती सोबत असावे फसवणुक करणाऱ्या लोकांन पासून आणि Casting Couch पासून सावधान राहा. जास्तीत जास्त नेटवर्किंग वाढवा यश नक्कीच मिळत चिकाटी आणि जिद्द पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये